मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थान सोडले; राष्ट्रवादी नाराज

0

मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेतील नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. सायंकाळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून शिवसेनेतील बंडखोर आमदारांना भावनिक साद घातली आणि परत येण्याचे आवाहन केले. मात्र एकनाथ शिंदे यांनी त्यांचा प्रस्ताव फेटाळला. त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला आणि ते मातोश्रीवर आले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या या कृतीबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.

बुधवारी दिवसभर घडलेल्या घडामोडींमुळे एकनाथ शिंदे यांचे बळ वाढल्याचे दिसून आले. राज्याच्या विविध भागातील आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळत होते. त्यामुळे शिंदे यांची ताकद वाढली आहे. मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाइव्हनंतर  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार त्यांना वर्षा बंगल्यावर भेटायला गेले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या बंगला सोडण्याच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.