नवी दिल्ली : भारतात प्रथमच डिझेल ट्रॅक्टर सीएनजीवर चालविण्यात येणार आहेत. रावमट टेक्नो सोल्यूशन्स आणि टॉमासेटो अचिले इंडियाद्वारे संयुक्तपणे तयार करण्यात आलेल्या ट्रॅक्टरचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आल.
सीएनजी एक स्वच्छ इंधन आहे, कारण त्यात कार्बन आणि इतर प्रदूषकांचे प्रमाण कमी आहे. कारण हा गैर- संक्षारक, जाड आणि कमी प्रदूषण करणारा असून, इंजिनचे आयुष्य वाढविण्यात मदत होणार आहे. विशेष म्हणजे हे अत्यंत स्वस्त आहे, कारण सीएनजीचे दर पेट्रोलच्या किमतीतील चढउतारांपेक्षा अधिक कमी आहेत.
सीएनजी वाहनांचे सरासरी मायलेजदेखील डिझेल आणि पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा चांगले आहे. तसेच हे खूप सुरक्षित आहे, कारण सीएनजी वाहनांमध्ये सीलबंद टाक्या असतात, ज्यामुळे रिफ्युएलिंग किंवा गळती झाल्यास स्फोट होण्याची शक्यता कमी करते. यात भविष्यात आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. कारण सध्या जगातील सुमारे 1 कोटी 20 लाख वाहने नैसर्गिक वायूवर चालविली जातात.
इंधनाच्या किमतीवर वर्षाकाठी एक लाख रुपयांहून अधिक बचत करण्याचा शेतकऱ्यांना सर्वात महत्त्वाचा फायदा होणार आहे. या व्यतिरिक्त त्यांचे जीवनमान सुधारण्यात देखील मदत होईल. चाचणी अहवालात म्हटले आहे की, रिट्रोफिटेड ट्रॅक्टर डिझेलवर चालणार्या इंजिनपेक्षा जास्त/समान ऊर्जा उत्पन्न करतो. यामुळे डिझेलच्या तुलनेत एकूण कार्बन उत्सर्जन 70% टक्क्यांनी कमी झाले आणि यामुळे इंधनावरील किमतीवर 50% टक्क्यांपर्यंत बचत होणार आहे, कारण सध्या डिझेलची किंमत 77.43 रुपये आहे तर सीएनजी फक्त 42 रुपये प्रति किलो आहे.