‘कॉकटेल’ लस अधिक प्रभावी : आयसीएमआर

0
नवी दिल्ली  : कोवॅक्सिन व कोविशिल्ड लस कोरोना रुग्णांना स्वतंत्रपणे देण्यापेक्षा या दोन्ही लसींचे मिश्रण दिल्यास ते अधिक प्रभावी ठरते, असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने केलेल्या प्रयोगांतून आढळून आले आहे.
पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी या संस्थेत हे प्रयोग केले. या दोन्ही लसींचे मिश्रण दिल्यास त्यामुळे रुग्णाला कोणताही अपाय होत नाही व त्याची प्रतिकारशक्तीही इतर वेळेपेक्षा अधिक वाढते. ९८ जणांवर केलेल्या प्रयोगांनंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. जगभरात कोरोना संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी वेगवेगळ्या लसींवर संशोधन सुरू आहे. आपल्या देशातही कोरोना लसींच्या कॉकटेल म्हणजेच मिक्स डोसवर सुद्धा अभ्यास सुरू आहे.
ICMR च्या संशोधनामध्ये कॉकटेलचे रिपोर्ट समोर आला आहे. कोरोनाच्या विरोधात भारतीयांना यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. कोवॅक्सिन आणि कोविशिल्डच्या मिक्स डोसबाबत झालेल्या संशोधनाचे चांगले परिणाम समोर आले आहेत.
ICMR ने दिलेल्या माहितीनुसार कोवॅक्सिन आणि कोविशिल्डचे मिश्रण करून 300 निरोगी कार्यकर्त्यांना देण्यात आले. त्यानंतर करण्यात आलेल्या परिक्षणात संबधित कार्यकर्त्यांमध्ये कोरोना संसर्ग प्रतिकारकशक्तीत सकारात्मक बदल झाल्याचे दिसून आले.
Leave A Reply

Your email address will not be published.