मुंबई : कोरोनामुळे बंद असणारी महाविद्यालये 15 फेब्रुवारी पासून सुरु केली जाणार आहे, अशी घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविद्यालयात पुन्हा सुरु करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. मात्र याबाबत काही बैठका देखील पार पडल्या. नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविद्यालय सुरु करण्यास परवानगी दिली आहे. येत्या 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहेत, असे उदय सामंत म्हणाले.
विद्यार्थ्यांना परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन देण्याची सूटही देण्यात आली आहे. शाळेत किंवा महाविद्यालयात 75 टक्के उपस्थिती अनिर्वाय असणे गरजेचे असते. मात्र यंदा कोरोनामुळे ही अट शिथील करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.