देशभरात करोना लसीकरणाची रंगीत तालीम सुरू

0

नवी दिल्ली ः करोना लसीकरणाची तयारी झाली आहे की, नाही याचा अंदाज घेण्यासाठी केंद्राकडून देशभरात वेगवेगळ्या राज्यांमध्ये करोना लसीकरणाची रंगीत तालीम म्हणजेच ड्राय रन घेण्यात येत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ४ जिल्ह्यांचा समावेश आहे.

या ड्राय रनसाठी पुणे, नागपूर, नंदूरबार आणि जालना आदी जिल्ह्यांची महाराष्ट्रातून निवड करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे की, देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आज करोना लसीकरणाची ड्राय रन घेण्यात येत आहे. त्यासाठी संपूर्ण तयारी झाली आहे आणि विविध पथकांचीही निर्मिती केली आहे”, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
पुण्यात अशी होणार ड्राय रन : पुणे जिल्ह्यातील तीन ठिकाणी करोना लसीकरण रंगीत तालीम घेण्यात येईल. सकाळी ९ वाजता पुण्यातील जिल्हा औंध रुग्णालय, पिंपरी-चिंचवड येथील जिजामाता रुग्णालय आणि ग्रामीण भागातील माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ही रंगीत तालीम होणार आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यांत तीन ठिकाणी प्रत्येकी २५ आरोग्य कर्मचाऱ्यांना या चाचणीत सहभागी करून घेतले जाणार आहे. या ७५ आरोग्य कर्मचाऱ्यांची जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच करोना लसीकरणासाठी तयार केलेल्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.