पंचायत समितीचा स्तुत्य उपक्रम ! सरकारी कार्यालयात दर गुरुवारी ‘NO VEHICLE DAY’

0
इंदापूर : प्रदूषण, वाहतुक कोंडी यासारख्या समस्याबद्दल केवळ चर्चा न करता त्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर पंचायत समितीने याकामी पुढाकार घेतला असून इंदापूर पंचायत समितीच्या कार्यालयात इथून पुढे दर गुरुवारी  ‘NO VEHICLE DAY’ पाळण्यात येणार आहे. गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी याबाबतचे परिपत्रक काढले आहे.
खाजगी वाहनांच्या अतिवापरामुळे सर्वत्र हवा तसेच ध्वनीचे प्रदूषण होत आहे. तसेच वाहनाच्या सतत वापरामुळे शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी पंचायत समितीच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला. यापुढे पंचायत समितीच्या कार्यालयात येताना स्वयंचलित (पेट्रोल, डिझेल आणि इतर इंधनावरील वाहने)
वाहनाऐवजी सायकल/ पायी अथवा सार्वजनिक वाहनाचा वापर करून कार्यालयात यावे, असे आदेश काढण्यात आले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यास योग्य दंड आकारला जाणार आहे. पंचायत समितीच्या कार्यालयात वीर कामासाठी येणाऱ्या नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी ही हा दिन पाळण्यात सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे. 
Leave A Reply

Your email address will not be published.