पिंपरी : बुधवारी रात्री राज्यातील पोलीस दलात अनेक फेरबदल करण्यात आले. यामध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची बदली करुन त्यांच्या जागी अंकुश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी तत्काळ पदभार स्वीकारून काम सुरु केले. आयुक्त शिंदे यांनी पहिल्याच दिवशी पहिला दणका दिला आहे. यामुळे आयुक्तालयातील अधिकारी, कर्मचारी यांची धाबे दणाणले आहेत.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाल्यानंतर तिसरे पोलीस आयुक्त म्हणून कृष्ण प्रकाश यांची नियुक्ती झाली आहे. पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी अवैध धंदेवाल्यांना तंबी दिली होती. मी असे प्रयत्न दुसरा काम धंदा पहा अन्यथा कारवाईला सामोरे जावा. यासाठी कृष्ण प्रकाश यांनी विशेष पथकाची ‘सामाजिक सुरक्षा’ची स्थापना केली.
पोलीस निरीक्षक, अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करुन अवैध धंद्यावर कारवाई सुरु केली. कृष्ण प्रकाश यांनी पदभार स्वीकारल्या पासून ते आज अखेर प्रयत्न या पथकाच्या कारवाया सुरु होत्या. मटका, जुगार, लॉटरी, अवैद्य दारु, वेश्या व्यवसाय, स्पाच्या नावाखाली अवैद्य धंदे, बेटिंग, वाळू उपसा, गुटखा आदी प्रकारच्या कारवाई सुरु होत्या.
आज 21 एप्रिल रोजी अंकुश शिंदे यांनी पोलीस आयुक्तपदाच्या पदभार स्वीकारला. पहिल्याच दिवशी त्यांनी सामाजिक सुरक्षा पथक बरखास्त केले. यामुळे अनेकांना धक्काच बसला आहे. सामाजिक सुरक्षा पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांना तत्काळ मूळ नेमणुकीच्या ठिकाणी कार्यमुक्त होण्याचे आदेश गुरुवारी रात्री उशिरा काढण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त शिंदे यांनी सुरु केलेल्या पहिल्याच दिवशीच्या कामामुळे विशेष पथकांचे धाबे दणाणले आहेत.