खे़डशिवापूर टोलनाक्यावर फास्टटँग स्थानिक वसुलीला समितीचा लगाम

0
भोर : आज मध्यरात्री पासून राज्यासह खेडशिवापुर टोलनाक्यांवर फास्टटँग अनिवार्य करण्यात आले असून टोलनाका हटाव कृती समिती आणि आमदार संग्राम थोपटे यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. आज सुरू झालेल्या फास्टटँगची पाहणी करण्यासाठी आलेल्या स्थानिक नागरिक आणि समितीने फास्टटँग वसुली बाबत आक्रमक पवित्रा घेतल्याने अखेर दुपारनंतर ठरल्यानुसार एच १२ व १४ वाहनांना दिलेली मोफत सवलत पुन्हा  सुरू करण्यात आली आहे. मात्र टोल प्रशासन आणि वाहनधारकांमध्ये तू तू मे मे दिवसभर राहिली होती.
खेडशिवापूर ( ता. हवेली ) येथील टोलनाक्यावर फास्टटँग वसुली सुरू केल्यास टोलनाका हटाव संघर्ष समितीसह आमदार संग्राम थोपटे यांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला दिला होता. टोल हटावचा निर्णय होत नाही तोपर्यंत एमएच १२ व १४ क्रमांकाच्या वाहनांना टोलमधुन सवलत कायम ठेवली होती. मात्र फास्टटँगच्या नावाखाली स्थानिकाकडून सक्तीने वसुली सुरू करण्यात आली होती. यामुळे वाद विवाद सुरू झाले होते. आज प्रत्यक्ष स्थानिकासाठी फास्टटँग आणि दिलेली सूट कायम आहे का? यासाठी समितीचे ज्ञानेश्र्वर दारवटकर, दिलीप बाठे, डॉ. संजय जगताप आदींनी टोलनाक्यावर घटनास्थळी पाचारण होत जाचक टोलवसुली बाबत वृत्तपत्र समोर आक्षेप घेतला. यानंतर दुपारनंतर स्थानिक वाहनधारणा मोफत सोडण्यात आले.
खेड शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीचे निमंत्रक ज्ञानेश्वर दारवटकर यांनी बोलताना सांगितले की, खेडशिवापूर टोलनाका हा मुळातच पीएमआरडी हद्दीच्या बाहेर तातडीने हटवावा अशी आमची कायमची मागणी असून वर्षापुर्वीच्या आंदोलनात ठरलेल्या निर्णयानुसार टोलनाका बाबत ठोस निर्णय होत तोपर्यंत एमएच १२ व १४ क्रमांकाच्या वाहनांना दिलेली सुट कायम ठेवावी. स्थानिकांकडुन फास्टटँगचे स्थानिक वाहनधारकावर भूत बसविले तर जनता गप्प बसणार नाही, त्याची जबाबदारी सर्व प्रशासनावर राहील असा इशारा दारटकर यांनी दिला आहे. दरम्यान दिवसभर टोल प्रशासनाकडून टोल वसुलीसाठी स्थानिक वाहनधारकाना दादागिरी करत असल्याची चर्चा झडत आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.