अपघातात तरुणाचा मृत्यू; नातेवाईकांना विमा कंपनीकडून नुकसान भरपाई
लोकन्यायालयात वकिलांनी मिळवून दिले 56 लाख 45 हजार रुपये
पिंपरी : अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता. हा दोन्ही दोन्ही पक्षांच्या वकिलांच्या तडजोडी नंतर लोकन्यायालयात निकाली काढण्यात आला. ॲडव्होकेट मनोहर गंरडे व ॲडव्होकेट श्रीधर येलमार यांनी मृत्यू झालेल्या कुटुंबियांना विमा कंपनीकडून 56 लाख 45 हजार एवढी रक्कम नुकसान भरपाई म्हणून मिळवून दिली.
दि.११/१२/२०२१ रोजी पुणे जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन विधी सेवाप्राधिकरण पुणे व पुणे बार असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने , पुणे जिल्हा मुख्य न्यायाधीश संजय देशमुख साहेब तसेच विधी सेवा प्राधिकरण पुणे चे प्रमुख सावंत याच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.
या राष्ट्रीय लोकअदालती मध्ये दिवाणी फौजदारी एन आय ॲक्ट प्रकरणे,बँकेची कर्ज वसुली प्रकरणे,कौटुंबिक वाद प्रकरणे,मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे,तसेच विविध प्रकारची न्यायालयीन प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी बहुतांश प्रकरणांमध्ये उभय पक्षांमध्ये तडजोडी होऊन प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.
त्यापैकी मोटार वाहन अपघात न्यायाधिकरण मधील क्लेम अर्ज उभय पक्षांमध्ये तडजोड होऊन निकाली काढण्यात आला. सदर प्रकरणातील मयत इसम पादचारी उन्मेष अशोक विभुते यांचे अपघाती निधन झालेले होते. त्यामुळे मोटार अपघात न्यायाधिकरणामध्ये मयत उन्मेष ची आई शोभा अशोक विभुते यांनी क्लेम अर्ज दाखल केला होता. सदर प्रकरणामध्ये अर्जदार व आय सी आय सी आय लोंबार्ड इन्शुरन्स कंपनी मध्ये तडजोड होऊन सदरचे प्रकरण रक्कम रूपये ५६,४५,००० रुपयांवर निकाली काढण्यात आला आहे.
याकामी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आष्टुरकर साहेब, व पॅनल जज ॲडव्होकेट अतुल गुंजाळ साहेब व ॲडव्होकेट दातार साहेब यांचेसमोर सदरचे प्रकरण निकाली काढण्यात आले. याकामी अर्जदारातर्फे ॲडव्होकेट मनोहर गंरडे व ॲडव्होकेट श्रीधर येलमार यांनी काम पाहिले, तसेच आय सी आय सी आय इन्शुरन्स कंपनीच्या वतीने ॲडव्होकेट ऋषिकेश गाणू यांनी काम पाहिले.