पिंपरी : येलमार समाजातील तरुण कष्टाळू, होतकरु आहेत. ध्येयवादी असणारे तरुण अभ्यासात चिकाटी धरतात. याचमुळे ‘एमपीएससी’ असो की क्रीडा क्षेत्र असो याच स्वतःची चमक दाखवतात. यापुढे समाजातील तरुणांनी ‘आयएएस, आयपीएस’ होण्यासाठी ‘युपीएसी टॉपर’साठी प्रयत्न करावेत. त्यासाठी आम्ही सर्व मदत करण्यास तयार असल्याचे मत येलमार समाज प्रतिष्ठाणचे अध्यक्ष संग्राम पाटील यांनी हिंजवडी येथे व्यक्त केले.
येलमार समाज प्रतिष्ठाणच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत चांगले यश मिळवणाऱ्या तरुणांचा आणि क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्यांचा जाहिर नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. आहे. त्यावेळी संग्राम पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तिरुपती ग्रुपचे डायरेक्टर सुरेश पाटील, अमेरिकेत असणाऱ्या कन्सल्टंट कंपनीने डायरेक्टर रमेश लोकरे, सीमा लोकरे, कंडरेज ग्रुपचे डायरेक्टर अजित कंडरे, तेजस पाईपच्या मालक माडगूळकर, उद्योजक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रंगनाथ येलमार, बलभीम कोळवले उपस्थित होते.
प्रतिष्ठाणच्या वतीने एमपीएसीद्वारे उपशिक्षणाधिकारी म्हणून निवड झालेले मयूर हणमंत लाडे, नायब तहशीलदार पदी निवड झालेले अमोल प्रकाश येलमार, राज्यात द्वितीय क्रमांकाने पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेले गणेश शंकर येलमार, जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता म्हणून निवड झालेले तेजस ईश्वर लाडे, सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्यक अभियंता म्हणून निवड झालेले राहुल शंकर कोळवले तसेच देशपातळीवर झालेल्या थाळी/गोळा फेक स्पर्धेत कांस्यपदक मिळवणारी अंकिता उलभगत आणि व्हॉलीबॉल स्पर्धेतील प्रज्वल येलपले यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी सन्मानमूर्ती तरुणांनी अभ्यासाचे योग्य नियोजन, शारीरिक तंदुरुस्त आणि योग्य मार्गदर्शन घेतल्यास यश मिळते हे सांगितले. येणाऱ्या काळात खातेनिहाय आणखी परीक्षा देऊन पुढील पदासाठी नक्कीच प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास निवृत्त सहायक पोलिस आयुक्त जी.एस. माडगूळकर, प्रा. पंकज येलपले, प्रवीण लाडे, अशोक येलमार, सुभाष येलमार, नामदेव येलमार, श्रीधर येलमार, दिलीप येलपले, भाऊसाहेब कोळवले, डॉ. विकास पाटील, सौरभ उलभगत, ऍड. श्रीधर येलमार, दत्तात्रय विभुते, सुहास गुराडे, राजेश लोकरे, बाळासाहेब येलपले, महेश येलमार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक येलमार, प्रास्ताविक राजेंद्र कंडरे आणि आभार भाऊसाहेब कंडरे यांनी मानले.