मुख्यमंत्री ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्या विरोधात तक्रार

0

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सामना वृत्तपत्राच्या संपादक रश्मी ठाकरे, युवा सेनेचे अध्यक्ष वरुण सरदेसाई यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. राणे यांची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर भाजपच्या गोटात विचारमंथन सुरू होते. भाजपच्या कार्यालयांसमोर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बुधवारी बैठका झाल्या.
बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे आणि युवासेनेचे अध्यक्ष वरुण देसाई यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्या आहेत.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल तक्रार दाखल केली. तसेच वरुण सरदेसाई यांनी फेसबुक लाईव्ह केल्याप्रकरणी भाजपने सायबर पोलीस ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

सामना वृत्तपत्रात आक्षेपार्ह लेखन केल्याबद्दल रश्मी ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी आक्रमक आंदोलन करणाऱ्या वरुण देसाईंविरोधात तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भाजपाच्या वतीने तीन जणांनी या तक्रारी दाखल केल्या आहेत. मुख्यमंत्री आणि वरुण देसाईंविरोधात ऋषिकेश अहेर यांनी तक्रार दाखल केली आहे.

देसाई यांनी मुंबईमधील राणेंच्या घऱाबाहेर जोरदार आंदोलन केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर देसाई यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्याचे फेसबुकवरुन लाइव्ह प्रक्षेपण करण्यात आल्याने आयपीसी कलम १५३ (अ), १०७ आणि २१२ सहीत सायबर गुन्ह्यांखाली तक्रार दाखल केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.