पिंपरी : सर्वसामान्य माणसांच्या पैशांवर डल्ला मारण्याचे काम, पैशांची उब सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या मुठभर नातेवाईकांना मिळणार असेल तर याच्या मुळापर्यंत जावे लागेल, करदात्यांच्या पैशांवरील डल्ला सहन केला जाणार नाही, अशी टीका शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.भाजपच्या काही नगरसेवकांकडून भ्रष्टाचाराची कबुली दिली असून सत्ताधारी आता प्रशासनावर खापर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी हजेरी लावली. बुधवारी दुपारी दोन वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत उपस्थित राहून त्यांनी सभेचे कामकाज पाहिले. निरीक्षण केले. सभा संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खासदार डॉ. कोल्हे म्हणाले
‘‘ सभागृहात बोलू दिले जात नाही, अशी तक्रार नगरसेवकांनी केली होती.
सहा तासांपैकी पाच तास मुळ विषयांना चर्चेत हात न घालणे तसेच भाजपच्या नगरसेवकांनीही स्मार्ट सिटी भ्रष्टाचाराबाबत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सभागृहात बोलून कबूली दिली. हे म्हणजे आता सर्व काही प्रशासनावर ढकलण्याचा केवीलवाणा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून येते.’’
‘‘एकूणच सभेत विषयांवर सखोल चर्चा न होणे यावरून ‘अतिथी कब जाओगे, अशी अपेक्षा सत्ताधा-यांना तर नव्हती ना? अशी शंका येते. सभेत तहकूब केलेले विषय बारकाईने लक्षपूर्वक पाहिले असता जलतरणतलाव भाडेवाढ, यांत्रिकी पद्धतीने रस्ते साफसफाई हे विषय तहकूब होतात. यावरून सत्ताधा-यांना नक्की काय लपवायचे होते, हे सर्वांच्या लक्षात आले आहे.
अर्थात हा आमचा पेशन्स तपासायचा प्रयत्न असावा असे सांगत, डॉ. कोल्हे म्हणाले, ‘‘खूप काही झाकून ठेवायचे आणिआयुक्तांना टार्गेट करायचे? आयुक्तांना टार्गेट का गेले? गेल्या साडेचारवर्षांत महापालिकेतील प्रशासकीय कामापेक्षा वेगळे काम केल्याने आयुक्तांना टार्गेट केले जात अशी शंका येत आहे. करदात्यांच्या पैशांवर डल्ला मारण्याचे काम केले जात आहे, हे सहन केले जाणार नाही