मुंबई : काँग्रेस पाच वर्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी आम्ही पाच वर्ष आहेत. याची ग्वाही आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनी दिली आहे. त्यामुळे प्रदेश काँग्रेस म्हणून आमची हीच भुमिका असल्याचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवाशी स्वबळाची भाषा करणार्यांना चांगलेच सुनावले होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेविषयी चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र पटोले यांनी आम्ही सरकारबरोबर पाच वर्ष असणार असल्याचे रविवारी स्पष्ट केले. एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
शिवसेना, भाजप आणि काँग्रेसने स्वबळावर लढणार असल्याचे जाहिर केले आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या भाषणात ते नक्की कोणाला बोलले याचे स्पष्टीकरण आल्यानंतर यावर प्रतिक्रिया देता येईल, राज्यात गेल्या पाच वर्षात शिवसेना भाजपचे सरकार असताना ते सुध्दा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये स्वतंत्र लढले. आम्ही काही वेगळे सांगत आहोत असे नाही. राज्यात असे प्रयोग झाले आहे. प्रत्येकाला आपला पक्ष उभा करणे , त्याला पुढे घेवून जाने कामच आहे.
काँग्रेसमध्ये अनेक कार्यकर्ते येत आहेत. आरपीआयचा मोठा गट काँग्रेसमध्ये येत आहे.भाजपला थांबवण्यासाठी आम्ही सरकारमध्ये सामिल झालो आहोत. यामध्ये आम्ही काही कायम सरकारमध्ये राहू असा कोठे उल्लेख नव्हता. आमचा स्वबळाचा नारा चुकीचा नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत वेगळे लढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यामुळे आता याची तयारी सुध्दा सुरु झाली आहे. ते काल मुख्यमंत्री म्हणून बोलत नव्हते ते शिवसेनेचे पक्ष प्रमुख बोलले. त्यामुळे आता ते नक्की कोणाला बोलले हे माहिती झाल्यावर अधिक भाष्य करता येईल.