मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाविकास आघाडी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढवणार असल्याचे संकेत दिले होते. मात्र यास काँग्रेस ने आपली भूमिका मांडली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिल्लीत 45 मिनिट भेट झाली आणि राज्याच्या राजकारणात चर्चाना सुरुवात झाली. पण महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे चालणार आणि लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र लढवणार हे स्पष्ट केलं.
शरद पवार यांनी महाविकास आघाडी एकत्र असण्याचे स्पष्ट करूनही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आपल्या दौऱ्यात काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचा नारा देत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत मतभेद असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी आणि सेना एकत्र दिसत असली तरी काँग्रेसचा सूर मात्र वेगळा आहे.