करोना लस आता नजरेच्या टप्प्यात

पुण्याहून निघणाऱ्या करोना लसीला मिळणार पोलिसांचे संरक्षण 

0

मुंबई ः करोना लसीचे तापमान मेटेंन करण्यासाठी महापालिकेने ३०० कोल्ड स्टोअरेज बाॅक्सेस आधीच संपादित केले आहेत. लस त्वरीत आणि वेगात पोहोचविण्यासाठी ट्रान्सपोटेशन सुविधेवर काम करत आहे. लस स्टोअरेजची मध्यवर्ती व्यवस्था कांजूरमार्गमध्ये आहे, असे वृत्त मुंबई मिररने वृत्त दिले आहे.

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोविशिल्ड’ लसीला मान्यता मिळाली, तर पुण्याहून निघणाऱ्या प्रत्येक गाडीला पोलिसांची संरक्षण कवच असेल. प्रत्येक कोल्ड स्टोअरेजच्या बाहेर पोलीस बंदोबस्त असणार आहे. जगात लसींची चाचणी वेगवेगळ्या टप्प्यांवर करण्यात येत आहेत. त्यात भारताच्या तीन स्वदेशी लसी आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.