कोरोनामुळे IPL सोडू लागले आहेत खेळाडू

0

नवी दिल्ली :  भारतात कोरोना संकटादरम्यान इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या सुरक्षित बायो बबलमध्ये सुद्धा खेळाडू चिंताग्रस्त झाले आहेत. भारताचा अनुभवी ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनसह काही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी लीग अर्धवट सोडून दिली आहे, तर बीसीसीआयने खेळ सुरूच राहील असे म्हटले आहे.

दिल्ली कॅपटिल्स (डीसी) च्या अश्विनने सनरायजर्स हैद्राबाद (एसआरएच) च्या विरूद्ध रविवारी मॅच जिंकल्यानंतर ट्विट केले, मी उद्यापासून (सोमवार) या सत्राच्या आयपीएलमधून ब्रेक घेत आहे. माझे कुटुंब कोरोना महामारीशी लढत आहे आणि या कठीण काळात त्यांना माझी आवश्यकता आहे. जर स्थिती सुधारली तर मी परत येईन. धन्यवाद दिल्ली कॅपिटल्स. अश्विनच्या कुटुंबातील काही सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजते.

ऑस्ट्रेलिया आणि राजस्थान रॉयल्स (आरआर) चा वेगवान गोलंदाज एंड्रयू टायने भारतात कोरोना प्रकरणे वाढल्याने आपल्या देशात प्रवेश बंद होण्याच्या शक्यतेने आयपीएल अर्धवट सोडली आणि दावा केला की ऑस्ट्रेलियाचे अनेक खेळाडू हा निर्णय घेऊ शकतात. तर, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु (आरसीबी) चा केन रिचर्डसन आणि अ‍ॅडम जाम्पाने सुद्धा वैयक्तिक करणांसाठी लीग सोडण्याचा निर्णय घेतला.

आयपीएलच्या मॅच 6 शहरांमध्ये दर्शकांशिवाय खेळवण्यात येत आहेत. टायने म्हटले की, त्याच्या शहरात पर्थमध्ये भारतातून येणार्‍यांच्या विलगीकरणाची प्रकरणे वाढल्याने हा निर्णय घेतला. टायने रॉयल्ससाठी अजूनर्यंत एकही मॅच खेळलेली नाही आणि त्यास एक कोटी रुपयांत खरेदी केले होते. त्याने म्हटले, सतत बबलमध्ये राहिल्याने थकवा वाटत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.