मुंबई : कोरोना लस घेतलेल्या व्यक्तींना कोरोना होण्याचा धोका कमी असतो हे पुन्हा एका नव्या संशोधनातून समोर आलं आहे. नुकतंच ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासानुसार असं समोर आलं आहे की, ज्या व्यक्तींनी कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत अशा व्यक्तींना कोरोनाची लागण होण्याचा धोका 3 पटीने कमी आहे.
यूकेच्या कोरोनावरील सर्वात मोठ्या अभ्यासापैकी एक, कम्युनिटी ट्रान्समिशनचा (REACT-1) रिअल-टाइम असेसमेंट अभ्यास बुधवारी नोंदवला गेला. यामध्ये इंग्लंडमध्ये संसर्ग 0.15 टक्क्यांवरून चार पटीने वाढून 0.63 टक्के झाल्याचं समोर आलं आहे. दरम्यान 12 जुलैपासून कोरोनाच्या प्रकरणांमध्ये घट झाली असल्याची माहिती आहे.
इम्पीरियल कॉलेज लंडन आणि इप्सोस मोरी यांनी 24 जून ते 12 जुलै दरम्यान इंग्लंडमधील अभ्यासात भाग घेतलेल्या 98,000 वॉलंटियर्सच्या केलेल्या विश्लेषणावरून असं म्हटलंय की ज्यांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत त्यांच्यामुळे इतरांना संसर्ग होण्याची शक्यता कमी आहे.
यूकेचे आरोग्य सचिव साजिद जाविद म्हणाले, “आमचे लसीकरण संरक्षणाची भिंत निर्माण करतंय. याचा अर्थ आम्ही काळजीपूर्वक निर्बंधांना कमी करू शकतो. मात्र असं करताना आपण सावध राहणं आवश्यक आहे. कारण या व्हायरससोबत जगणं आपण शिकत आहोत.”
पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या माहितीने असं समोर आलं आहे की, युकेमध्ये देण्यात येणारी लस ही कोरोनाच्या प्रत्येक वेरिएंटच्या विरोधात खूप प्रभावी आहे. याप्रमाणे, फाइजर लस 96 टक्के प्रभावी आणि एस्ट्राजेनेका लसीच्या दोन डोसांनंतर 92 टक्के प्रभावी आहे. पीएचईच्या म्हणण्याप्रमाणे, इंग्लंडमध्ये, लसीकरणाने 22 दशलक्ष संसर्ग, अंदाजे 52,600 रुग्णालयात दाखल आणि 35,200 ते 60,000 मृत्यू रोखल्याचा अंदाज आहे.