महाराष्ट्रातून ११ राज्यात जाण्यासाठी कोरोना निगेटिव्ह अहवालाची गरज

0

मुंबई: महाराष्ट्रातून दिल्ली, पश्चिम बंगाल, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा या राज्यांसह जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशात तुम्हाला जायचे असेल तर कोरोना टेस्ट अहवाल निगेटिव्ह गरजेचा आहे.

मध्यप्रदेशात जाण्यासाठी कोरोना निगेटिव्ह रिपोर्टची सक्ती करण्यात आली आहे.रिपोर्ट नसेल तर मध्यप्रदेशात महाराष्ट्रातील प्रवाशांना प्रवेश देण्यात येणार नाही. महाराष्ट्रात विशेषत: नागपूरमध्ये रुग्णवाढ अधिक झाल्याने मध्यप्रदेश सरकारने हा निर्णय घेतला आहे. नागपूर जिल्ह्याला लागून असेलेल्या मध्यप्रदेशमधील छिंदवाडा जिल्ह्यात व्यावसायिक कामानिमित्त दोन्ही राज्यातील नागरिकांच मोठ्या प्रमाणात ये-जा असते या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

दिल्ली सरकारनेही महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि पंजाबमधील प्रवाशांना दिल्लीत एन्ट्री करण्यासाठी कोरोना रिपोर्ट बंधनकारक केला आहे. दिल्लीमध्ये फ्लाइट्स, ट्रेन आणि बसमधून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना निगेटि्व्ह रिपोर्ट दाखवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. हा नियम 15 मार्चपर्यंत लागू राहणार आहे.

पश्चिम बंगलामध्ये बुधवारपासून राज्यात यायचे असेल तर कोरोनाचे निगेटिव्ह सोबत ठेवणं बंधनकारक केलं आहे. कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट नसेल तर महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक आणि तेलंगनाहून विमानाने येणाऱ्या प्रवाशांना पश्चिम बंगालमध्ये प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा नियम 27 फेब्रुवारीपासून लागू करण्यात येणार आहे. प्रवाशांना विमानतळावरून उड्डाण करण्यापूर्वी 72 तासांत आरटीपीसीआर चाचणी करावी लागणार आहे. म्हणजे त्यांच्याकडील कोरोना रिपोर्ट 72 तासांतीलच असावा, त्या पूर्वीचा नसावा.

Leave A Reply

Your email address will not be published.