नवी दिल्ली : अफ्रिकेत नव्यानं आढळून आलेल्या ओमिक्रॉन नामक कोरोना व्हेरियंटनं अल्पावधीच पुन्हा एकदा जगाला भीतीच्या छायेतलोटलं आहे. यापार्श्वभूमीवर दक्षिण अफ्रिकेतून कर्नाटकात आलेल्या दोन प्रवाशांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळंकर्नाटक राज्य सरकारचीच नव्हे तर देशाची झोप उडाली आहे. या दोन्ही प्रवाशांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यानंतरच याबाबत स्पष्टपण काही सांगता येईल, असं संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आपत्कालीन बैठक बोलावली. तसेच कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी नव्या गाईडलाईन्सजाहीर केल्या. कर्नाटकचे मंत्री आर. अशोक यांनी सांगितलं की, दक्षिण अफ्रिकेतून १००० हून अधिक लोक आहेत. त्या सर्वांचीतपासणी करण्यात आली आहे. जे लोक यापूर्वीच बंगळुरु किंवा कुठे आधीच उतरले आहेत. त्यांची १० दिवसांनंतर पुन्हा चाचणी केलीजाणार आहे.
बैठकीत झालेल्या निर्णयांनुसार, केरळ आणि महाराष्ट्र या सीमावर्ती राज्यांतून येणाऱ्या लोकांवर कडक नजर ठेवली जाईल. राष्ट्रीयमहामार्गांवर कडक नजर ठेवली जाईल. केरळ आणि महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्यांना आरटी–पीसीआर चाचणीचा अहवालनिगेटिव्ह असणं बंधनकारक करण्यात आलं आहे.