कोरोना चाचणी आता एवढ्या रुपयांत

0
मुंबई : परदेशात कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढला असून काही देशांनी लॉक डाऊन केले आहे. राज्यातही कोरोनाचे प्रमाण पुन्हा वाढू लागले आहे. यातच करोना चाचण्यांच्या दरामध्ये शासनाने कपात केली असून आता चाचणीसाठी ९८० रुपयांऐवजी ७०० रुपये हा दर निश्चित करण्यात आली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत दिली.

राज्यात करोनाचा धोका पूर्णपणे टळला नसला तरी नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही दिलासादायक बाब आहे. मात्र, अजूनही नागरिकांनी खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. राज्याचा रुग्णवाढीचा दर हा ०.२१ इतका असून केंद्र शासनाच्या पोर्टलवर रुग्णवाढीचा दर जास्त असलेल्या १४ राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश नसल्याचे यावेळी आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात करोना चाचण्यांचे दर सातत्याने कमी केले जात आहेत. केंद्र शासनाने निश्चित केलेल्या ४५०० रुपयांवरुन आता ७०० रुपयांमध्ये खासगी प्रयोगशाळेत करोना चाचण्या होणार आहेत. राज्य शासनाने करोना उपाययोजनांसदर्भात निर्णय घेताना सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेऊन निर्णय घेतले. चाचण्यांचे दर कमी करतानाच खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा राखीव ठेवल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.