नवी दिल्ली : चीनसह अनेक देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. दोन दिवसांपासून विमानतळावर प्रवाशांची रॅन्डम कोरोना चाचणी केली जात आहे.
मागील दोन दिवसांत परदेशातून आलेल्या 39 प्रवाशांना कोरोनाची झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून विमान प्रवासासाठी नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. BF.7 व्हेरियंटमुळे जगभरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे भारतामध्येही खबरदारी घेतली जात आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून उपाय योजना करण्यात येत आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 आणि 27 तारखेला विमानतळावर सहा हजार प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये 39 प्रवासी कोरोनाबाधित असल्याचं समोर आले आहे. सर्व प्रवाशांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांचे नमुणे तपासासाठी लॅबमध्ये पाठण्यात आले आहेत.
कोणत्या देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नियमावली –
केंद्र सरकारने जारी केलेल्या गाईडलाईन्समध्ये सहा देशांतून येणाऱ्या प्रवाशांचा समावेश आहे. यामध्ये चीन, जापान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग, थायलँड आणि सिंगापूर या देशातून येणाऱ्या फ्लाईट्सचा समावेश आहे. या देशातून येणाऱ्या प्रवाशांना ‘एयर सुविधा’ गाइडलाइन लागू कऱण्यात येणार आहे. या देशातून येणाऱ्या सर्वा प्रवाशांना RT-PCR चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. विमानतळावील सुविधांची चाचपणी करण्यासाठी आरोग्यमंत्री मनसुख मांडविया गुरुवार विमानतळावर जाणार आहेत.
चीन, जापान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग, थायलँड आणि सिंगापूर येथून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला आरटी पीसीआर चाचणी अनिवार्य आहे. एखादा प्रवाशी पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला विलगीकरणात ठेवलं जाईल.