करोना लसीकरणाची युद्धपातळीवर तयारी
केंद्राकडून राज्यांना पाठविला स्टॅन्डर्ड ऑपरेटींग प्रोसिजरचा ड्राफ्ट
बंगळुरू ः करोना लसीकरणाला घेऊन सध्या देशात चांगलीच चर्चा होत आहे. लसीकरण व्यवस्थित व्हावे, यासाठी केंद्राकडून मोठी योजना आखली जात आहे. एका लसीकरण केंद्रावर ५ कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत आणि लस टोचून झाल्यावर रुग्णाला किमान अर्धा निरिक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.
केंद्राने प्रत्येक राज्यांना स्टॅन्डर्ड ऑपरेटींग प्रोसिजरचा ड्राफ्ट पाठविला आहे. त्यात लसीकरणाची तयारी सांगण्यात आली आहे. एका लसीकरण केंद्रावर एका दिवसात १०० लोकांना लस टोचली जाणार आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाला ही माहिती देण्यात येणार आहे.
प्रत्येत केंद्रावर तीन खोल्या वेटींगासाठी, लसीकरण आणि निरीक्षणासाठी उभारण्यात येणार आहे. ३० मिनिटे रुग्णाला लसीकरणानंतर निरीक्षणाखील ठेवण्यात येणार आहे. जर, त्या रुग्णाला रिएक्शन आली तर, त्वरीत हाॅस्पिटलमध्ये दाखले केले जाईल. केंद्राच्या एका दिवसाच्या वर्कशाॅपमध्ये सहभागी झालेल्या आरोग्य अधिकारी डाॅ. रजनी एन म्हणाल्या की, ” सोशल डिस्टसिंगचे नियम पाळण्यात यावेत याकरीता लसीकरणासाठी तीन खोल्या यासाठी उभारल्या जात आहेत.”