शरद पवार यांनी घेतली कोरोना लस

0
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनी मुंबईमधील जे. जे. रुग्णालयात कोरोनाची लस घेतली आहे. आज दुपारी तीनच्या सुमारास पवारांनी रुग्णालयामध्ये येऊन लस घेतली.

आजपासून देशात करोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला असून त्याअंतर्गत 60 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिक 45 वर्षांवरील सहव्याधी असलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. आज सकाळीच सात वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये कोरोनाच्या लसीचा पहिला डोस घेतला.

शरद पवार हे कोरोना प्रतिबंधक लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते ठरले आहेत. प्राथमिक तपासणी झाल्यानंतर शरद पवार यांना सिरमची कोव्हिशिल्ड लस देण्यात आली. शरद पवार यांच्यासोबत त्यांची कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यादेखील रुग्णालयात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.