गोरखपूर ः उत्तरप्रदेशमध्ये पहिल्यापासूनच करोना प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविले आहे. एक महिन्याच्या आत करोना लस मिळेल, असा दावा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.
योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, ”करोना लस मिळण्यापासून आपण फक्त एक महिन्यांच्या अंतरावर आहोत. उत्तरप्रदेशमध्ये करोना संक्रमणावर नियंत्रण मिळविलेले आहे. करोनामध्ये मृत्यूदर ८ टक्के आहे, तर राज्यात फक्त १.०४ टक्के इतकाच आहे.”
उत्तरप्रदेशमध्ये करोनावर मिळविलेले नियंत्रण पाहून जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील राज्याचे कौतुक केलेले आहे आणि त्यांनी सांगितले आहे की, यावर संशोधन झाले पाहिजे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी यांनी पुढच्या काही दिवसांत आपल्या करोना लस उपलब्ध होऊ शकेल, असं सांगितले होते.