पिंपरी : दिवाळी सण हा भारतीयांचा सर्वात महत्त्वाचा व आनंददायी सण म्हणून साजरा केला जातो. हा दिवाळीचा सण आता फक्त चार दिवसावर आला आहे. या दिवाळी सणानिमित्त गरजू, गरजवंत मुलांना, नागरिकांना मदत व्हावी, या दृष्टिकोनातून अनेक सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत व आपापल्या पद्धतीने गरजू कुटुंबांना मदत करीत आहेत.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यमान नगरसेवक, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांची सामाजिक संस्था नाना काटे सोशल फाउंडेशन व श्री फाउंडेशन यांच्या वतीने अनाथ मुलांना मदत करण्यात आली आहे.
दिवाळी निमित्त नाना काटे सोशल फाऊंडेशन व श्री फाउंडेशनच्या वतीने ओम श्री साई मतिमंद अनाथ आश्रमातील १८ वर्षाखालील १५० मुला-मुलींना मनपसंतीनुसार काळेवाडी येथील वामन फॅशन क्लॉथ स्टोअर्स मधुन कपडे, व दैनंदिन वापराच्या वस्तू ,शालेय वस्तू खरेदी करून देण्यात आले.
यावेळी या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मा. विरोधी पक्षनेते श्री. विठठ्ल ऊर्फ नाना काटे, आश्रमाचे संस्थापक सागर पाडाळे आदी उपस्थित होते.