स्थायी सभापतीपदी डावलल्याने नगरसेवक रवी लांडगे यांचा राजीनामा

0

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापती पदासाठी भाजप पक्षाने डावलल्याने नाराज झालेले नगरसेवक रवी लांडगे यांनी तडकाफडकी स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

रवी लांडगे यांची नाराजी दूर करण्याचे आव्हान शहरातील पक्षप्रमुख म्हणून भाजपच्या नेत्यांपुढे आहे. रवी लांडगे यांनी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.

भाजपकडून स्थायी समिती सभापतीसाठी नितीन लांडगे यांचा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. या नंतर रवी लांडगे यांनी राजीनामा दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.