मागील साडेचार वर्षात त्यांना महापालिकेतील महत्वाचे पद मिळाले नव्हते. स्थायी समिती सदस्यत्वासाठी ते तीव्र इच्छुक होते. पण, त्यांना संधी मिळाली नाही. अखेर भोसले यांना शहरप्रमुखपद बहाल केले आहे. त्यांचाकडे पिंपरी, चिंचवड, भोसरीची जबाबदारी दिली आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने नगरसेवक सचिन भोसले यांची निवड केली असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, माजी शहरप्रमुख योगेश बाबर यांची पिंपरी, चिंचवड, भोसरीच्या जिल्हा सहसंपर्कप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. तर, गजानन चिंचवडे यांची मावळ, चिंचवड, पिंपरीच्या जिल्हाप्रमुखपदी फेरनिवड करण्यात आली आहे.