नगरसेवक संदीप वाघेरे यांनी राखली सामाजिक बांधिलकी
स्वतःच्या खर्चातून 50 बेड, 4 व्हेंटिलेटर लोकार्पण केले
पिंपरी : नगरसेवक संदीप वाघेरे यांनी स्वतःच्या खर्चातून कोरोनाबाधित रुग्णांसाठी महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयाकरिता 50 बेड, 4 व्हेंटिलेटर आणि 2 हाई फ्लो मशीन दिल्या आहेत. त्याचे लोकार्पण आज झाले.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार विलास लांडे, गौतम चाबुकस्वार, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, पीसीएमटीचे माजी अध्यक्ष संतोष कुदळे, जिजामाताचे डॉ. बाळासाहेब होडगर, डॅा. रोहीत पाटील, डाॅ.संगिता तिरूमणी, डाॅ. करूना साबळे, स्वीकृत सदस्य कुणाल लांडगे, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कुदळे उपस्थित होते. त्यावेळी महापालिका आयुक्त पाटील बोलत होते.
“आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे. नगरसेवक संदीप वाघेरे यांनी 50 बेड देऊन वेगळा आदर्श निर्माण केला आहे. जनता, प्रशासनाच्या लढाईला त्यांनी बळ दिले आहे. निश्चितच ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. वाघेरे यांची भूमिका नेहमी जनतेच्या हिताची असते. मी त्यांना पहिल्यादिवसापासून पाहत आहे. महापालिका प्रशासनाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो.
त्यांच्या या उपक्रमामुळे इतर दानशूर व्यक्तीला प्रेरणा मिळेल. या प्रेरणेतून आणि सर्वांच्या सहभागातून महापालिका कोरोनाला हद्दपार करून पुढे वाटचाल केली जाईल. या लढाईत नकारात्मक भूमिका न घेता, सर्वांनी आपल्या परीने काय करता येईल. याचा विचार करून मदत करावी. संकटाच्या काळात सर्वांनी आपली आपली भूमिका योग्य पध्दतीने पार पाडावी “.
“इतर महापालिकेच्या तुलनेत शहरातील सोयी सुविधा खूप चांगल्या आहेत. महापालिकेकडे 450 व्हेंटिलेटर, 2500च्या वर ऑक्सिजन बेड आहेत. कालच खासगी दवाखान्याना 35 व्हेंटिलेटर बेड दिले आहेत. जम्बोत 40 बेड उपलब्ध केले जाणार आहेत. महापालिकेच्या नवीन चार हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचे 700 बेड उपलब्ध करणार आहोत. पुढच्या तीन महिन्यात या रुग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध होतील. 40 ते 45 टक्के बेड ग्रामीण भागातून आणि बाहेरून येणाऱ्या रुग्णांसाठी बेड देतो. सर्व रुग्णांना वैद्यकीय मदत देण्याचा प्रयत्न करतो’, असेही आयुक्त पाटील यांनी सांगितले