पिपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भांडार विभागातील खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. तत्कालिन उपायुक्त यांनी केलेल्या खरेदीची चौकशी करणे आवश्यक आहे. या काळात मनपा तिजोरीची या काळात अक्षरशः लूट झालेली असून या लुटीची चौकशी होणे आवश्यक आहे. १२ फेब्रुवारी २०२१ भांडार विभागातील उपायुक्त यांची बदली करण्यात आली व त्यांना दक्षता व नियंत्रण पथकाची जवाबदारी देण्यात आली म्हणजे ज्यांच्या काळात भ्रष्टाचार झाला त्यांनाच चौकशीचे अधिकार दिले हे कितपत योग्य आहे, असा सवाल देखील आमदार अण्णा बनसोडे यांनी उपस्थित केला होता.
तसेच त्याची चौकशी करून त्वरित कार्यवाही करण्यात यावी, आणि भांडार विभागातील अधीकाऱ्यांनी दक्षता व नियंत्रण विभागाची दिलेली जवाबदारी रद्द करावी, अशी मागणी पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली होती. त्यानुसार दक्षता व नियंत्रण कक्षाकडील चौकशी नेमण्यास २७ मार्च २०२१ रोजी मान्यता मिळालेली आहे. त्यानुसार कोविड काळात झालेल्या व होणाऱ्या खर्चाची चौकशी व पडताळणी होऊन कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती दक्षता व नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.
आमदार अण्णा बनसोडे यांनी सर्वप्रथम या चौकशीची मागणी केली होती. आणि आता आयुक्तांनी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिल्यामुळे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मागणीला यश आले आहे.