काँग्रेस अध्यक्षपदासाठी आज मतमोजणी

0

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल आज (ता. १९) जाहीर होणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर हे दोघे अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत.

या दोन्ही उमेदवारांचे आणि काँग्रेस पक्षाचे भवितव्य सोमवारी (ता. १७) मतपेट्यांमध्ये बंद झाले होते. या निवडणुकीमुळे काँग्रेसला दोन दशकांहून अधिक काळानंतर प्रथमच गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.