पुणे : राज्यभर गाजत असलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बी एच आर पतसंस्था घोटाळा प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार चंदूलाल पटेल यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल काही दिवसापुर्वी दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने हा गुन्हा नोंदवला आहे.
चंदूलाल पटेल यांनी जळगाव येथील बी एच आर पतसंस्थेचा मालमत्ता कमी किंमतीत विकून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. बिएचआर पतसंस्थेतील गैरव्यावहारा प्रकरणी पुणे पोलिसांच्या अर्थीक विभागाने जळगावसह इतर ठिकाणी छापे टाकत 12 जणांना गेल्या महीन्यात अटक केली होती.व आरोपी आ.चंदूलाल पटेल गुन्हा दाखल झाल्यापासून फरार.
बी एच आर अर्थात भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था कोट्यवधी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचे समोर आल्यानंतर संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली होती. या पतसंस्थेच्या देशभरातील सात राज्यांमध्ये 264 शाखा असून 28 हजार ठेवीदार आहेत. तर पतसंस्थेच्या खात्यामध्ये 1100 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.
दरम्यान मुदत संपल्यानंतर देखील ठेवीच्या रकमा परत मिळत नसल्यामुळे 2015 मध्ये हा घोटाळा समोर आला होता. यानंतर भाईचंद हिराचंद संस्थेच्या 13 संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान भाजपा आमदार चंदू पटेल यांचा शोध पुणे पोलिस घेत आहेत.