कंपनीत घुसून महिलेला शिवीगाळ करणाऱ्यावर गुन्हा

0

पिंपरी : पतीच्या ओळखीच्या इसमाने थेट कंपनीत घुसून महिलेला अश्लिल इशारे करत शिवीगाळ केली आहे.हा प्रकार बुधवारी(दि.22) मारुंजी, हिंजवडी येथे घडला.

याप्रकरणी पीडितेने फिर्याद दिली असून भवनसिंग चितोडिया (45 रा, मारुंजी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांच्या पतीच्या तोंड ओळखीचा इसम आहे. फिर्यादी या त्यांच्या कंपनीत कामकरत असताना आरोपी तेथे आला त्याने अश्लिल हावभाव करत तुने ये कॅमेरा इधर क्यू बिठाने दिया म्हणत शिवीगाळ केली. आरोपीविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.