पिंपरी : गुन्हे शाखा युनिट चारने एका सराईत वाहन चोराला अटक केली. त्याच्याकडून पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीणपोलिसांच्या हद्दीतून चोरलेल्या 11 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
राहुल दगडू शिंदे (20, रा. ओटास्कीम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्यामाहितीनुसार, पोलीस रेकॉर्डवरील आरोपींची माहिती तपासत असताना आरोपी राहुल शिंदे हा त्याच्या मूळ पत्त्यावर राहत नसल्याचेसमोर आले. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट चारने राहुल शिंदे याच्याबाबत माहिती काढून त्याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने मागील एक वर्षात पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतून 11 दुचाकी वाहनेचोरी केल्याचे सांगितले. चोरी केलेली वाहने तो इतर नागरिकांना कमी पैशांमध्ये विकत असे. पोलिसांनी राहुल शिंदे याच्याकडून पाचलाख 10 हजार रुपये किमतीच्या 11 दुचाकी जप्त केल्या आहेत. पुढील कारवाईसाठी आरोपी राहुल शिंदे याला सांगवी पोलिसांच्याताब्यात देण्यात आले आहे.
हि कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक आयुक्त प्रशांतअमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शंकर अवताडे, सहायक निरीक्षक सिद्धनाथ बाबर, उपनिरीक्षक गणेश रायकर, अमंलदारदादा पवार, नारायण जाधव, संजय गवारे, रोहिदास आडे, तुषार शेटे, मोहम्मदगीस रफिक नदाफ, सुनील गिड्डे, सुरेश जयभाये, धनाजीशिंदे, गोविंद चव्हाण, सुखदेव गावंडे या पथकाने केली आहे.