सरकारवर टिका करणे हेच विराेधी पक्षनेत्यांचे काम – डाॅ.नीलम गाेऱ्हे

0

औरंगाबादेचा नामांतर संभाजीनगर करण्याचे विषयावरुन राज्यात राजकीय वादंग सुरु असून विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना व काॅंग्रेसवर टिका करत ते नाटक कंपनी असल्याचा आराेप केला आहे. त्यांचे टिकेला विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ.निलम गाेऱ्हे यांनी प्रत्युत्तर देत, सरकारवर टिका करणे हेच विराेधी पक्ष्याचे नेत्यांचे काम आहे. जर त्यांनी टिका केली नाही तर ते नाटक कंपनीतीलच एक पात्र आहेत का अशी शंका वाटेल. विराेधक प्रेक्षक म्हणून चांगली भूमिका निभावत आहे.

निकाेप लाेकशाहीकरिता विराेधकांनी स्वत:ची भूमिका जबाबदारीने पार पाडावी. आमचे भूमिकेवर शंका घेण्याची गरज नाही, काेराेना काळात महाविकास आघाडी सरकारने गटबाजी न करता एकमताने काम केले. फडणवीस यांना धक्का बसला मी परत आता परत जायची वेळ आली आहे अशी टिका गाेऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. गाेऱ्हे म्हणाले, औरंगाबादचे नामांतराबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे याेग्यवेळी निर्णय घेतील. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करणे हा मुळात वादाचा किंवा टिकेचा विषय नाही. कारण, संभाजीनगरचा प्रस्ताव शासनाने आधीच ठेवण्यात आलेला आहे.

महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि संभाजीनगरच्या स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन त्यांचे मतानुसार याेग्यवेळी निर्णय घेतील. परंतु काही लाेक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून समाजात काही लाेकांचे भावना दुखवुन दुही माजविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. समाजातील एकाेपा कुठे ही भंग पावू नये यादृष्टीने त्याचा विचार झाला पाहिजे. पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव दिले गेले त्यावेळी पूर्णपणे पुणेकरांनी एकमताने नाव स्विकारले आहे. पुणे शहराचे नावाचे नामांतराबाबत मी विधान परिषद उपसभापती असल्याने एक भूमिका घेऊ शकत नाही. महाराष्ट्र विधिमंडळ अाणि पुणे मनपा यांचे विचाराने सर्व पक्षाचे विचारविनिमयाने नामांतराबाबत विचार हाेऊ शकेल. जिजाऊ बद्दल प्रत्येकास आदर आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करणे प्रयत्न सुरु असताना त्याला कलाटणी देण्याकरिता पुण्याचे नाव बदलणे विषय पुढे आला. छत्रपती संभाजी महाराजांचा गाैरव यावर लक्ष्य केंद्रित करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.