कोट्यावधीची फसवणूक; बांधकाम व्यवसायिक संदीप अगरवाल याच्यासह तिघांना अटक

बनावट स्वाक्षऱ्या करुन केले व्यवहार

0

पिंपरी : बांधकाम व्यवसायिक आगरवाल यांच्या किवळे परिसरात सुरु असलेल्या बांधकाम साईटसाठी श्री साई रियालिटी, श्री साई इन्फोटेक व श्री. साई बिल्डटेक नावाच्या संस्थामध्ये गुंतवणूक केलेल्या भागीदाराची फसवणूक केली आहे. यामध्ये 1 कोटी 30 लाख रुपयांची गुंतवणूक केली असून नफा सुमारे 4 कोटी रुपये येणार असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी तिघांना अटक केली असून सोमवार प्रयत्न पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.

या प्रकरणी संदीप दीनदयाल अगरवाल, सचिन दीनदयाल अगरवाल आणि सुमीत दीनदयाल अगरवाल तिन्ही बांधकाम व्यवसायिकांना देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी सोमवार प्रयत्न पोलीस कोठडी सुनावली आहे. तर कपिल सतपाल अगरवाल याच्यावर गुन्हा दाखल असून त्याचा शोध सुरु आहे. रोहिदास शामराव तरस (४३, रा.विकासनगर, किवळे) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; अगरवाल याच्या किवळे परिसरात बांधकाम साईट सुरु आहेत. या साईटसाठी अगरवाल यानी श्री साई रियालिटी, श्री साई इन्फोटेक व श्री. साई बिल्डटेक नावाच्या संस्था सुरु केल्या. या संस्थामध्ये तरस यांना भागीदारी दिली. त्यासाठी त्यांच्याकडून 1 कोटी 30 लाख रुपयांची भांडवल घेतले. तरस यांच्याप्रमाणे विनय दीनदयाल गुप्ता आणि सागर वेदप्रकाश गुप्ता या दोघांनाही भागीदार म्हणून घेतले.

अगरवाल यांनी तरस यांना फसविण्याच्या उद्देशाने सुरुवातीपासून खोटे कागदपत्रे तयार केली. तरस यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करुन विनय गुप्ता आणि सागर गुप्ता या दोघांना निवृत्त झाल्याचे ‘डिड ऑफ रिटायरमेंट’ ची कागदपत्रे करुन दिली. अगरवाल यांनी या प्रकल्पातील (साईट) अनेक गाळे, सदनिका विक्री करुन पैसे स्वतःकडे ठेवले. यातील तरस यांच्या हिस्साचा सुमारे नफा 4 कोटी नफा येणे बाकी आहे. याबाबत तरस यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर तिघांना अटक केली आहे.

श्री साई रियालिटी, श्री साई इन्फोटेक व श्री. साई बिल्डटेक नावाच्या संस्थामध्ये संदीप दीनदयाल अगरवाल, सचिन दीनदयाल अगरवाल, सुमीत दीनदयाल अगरवाल, कपिल अगरवाल, रोहिदास तरस यांच्यासह अन्यही भागीदार आहेत. भागीदार रोहिदास तरस यांच्या परस्पर अगरवाल यानी बनावट स्वाक्षऱ्या केल्या प्रकरणी यापूर्वीही देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.