तपासासाठी गेलेल्या पोलीस पथकावर जमावाचा हल्ला

0

पुणे : तपासासाठी गेलेल्या पुणे पोलिसांच्या पथकावर जमावाने हल्ला केला. खबऱ्याचा खून करण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांना बेदम मारहाण केली. हि घटना वारज्यातील म्हाडा कॉलनीत मध्ये घडली आहे. मंगळवारी रात्री हा प्रकार घडला असून बुधवारी गुन्हा आज केला आहे.

याप्रकरणी पोलीस कर्मचारी श्रीकांत दगडे (33) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार सव्वाशे ते दीडशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत दगडे यांची गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकात नेमणूक आहे. दरम्यान, ते व त्यांचे सहकारी ऋषिकेश कोळप हे वारजे येथे पेट्रोलिंग करण्यास गेले होते. यावेळी त्यांना त्यांच्या बतमीदारामार्फत माहिती मिळाली होती की अभिजित खंडागळे याच्याकडे गावठी पिस्तुल आहे. तसेच तो साथीदारासह जबरी चोरी करणार आहे. तो राहण्यास म्हाडा कॉलनी इमारत दोन येथे चौथ्या मजल्यावर राहतो. त्यानुसार ही माहिती फिर्यादी यांनी त्यांच्या वरिष्ठांना दिली. तसेच एका मित्रालासोबत घेऊन बातमीदार व संबंधित पोलीस म्हाडा कॉलनी येथे गेले. त्यांनी गाडी पार्क केली. तसेच चौथ्या मजल्यावर गेले.

अभिजित याच्या रूमचे दार वाजवले आणि महिलेला अभिजित याच्याबाबत विचारपूस करत चौकशी केली. महिलेने तो बाहेर गेला असल्याचे सांगितले. तोपर्यंत येथे मोठ्या प्रमाणात जमाव जमला. यामुळे फिर्यादी यांना संशय आला. यावेळी मात्र इमारती खाली मोठ्या प्रमाणावर जमाव जमला होता. त्यातील काहींनी खबऱ्याकडे पाहत तू आमच्याबाबत पोलिसांना माहिती देत असतो, आज तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तर बांबू, विटा, सिमेंटच्या ब्लॉकने त्याला मारहाण केली. अधिक तपास वारजे माळवाडी पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.