पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये रात्री दहा नंतर कडक निर्बंध करण्यात आले आहेत. तसेच 31 मार्च पर्यंत शाळा, कॉलेज बंद (दहावी-बारावी परीक्षा वगळून) राहणार आहेत. ही माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आज मिटिंग मध्ये हे निर्णय घेण्यात आले आहेत. रात्री दहा प्रयत्न हॉटेल रेस्टॉरंट चालू राहणार असून रात्री अकरा वाजेपर्यंत पार्सल सेवा सुरू ठेवता येणार आहे. शहरातील उद्यान एक वेळ, संध्याकाळी बंद ठेवण्यात येणार आहेत. दशक्रिया अंतयात्रेला 50 जणांची उपस्थिती असणार आहे.
सर्व मॉल दहा वाजता बंद होतील. एका ठिकाणी फक्त 5 लोक थांबू शकणार आहे. असा प्रकारचे कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल केले जाणार आहेत.