पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला

0
पिंपरी – पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पातंर्गत निगडी येथील व्यापारी संकूल येथे में टेक महिन्द्रा लि . व त्यांचे भागीदार पार्टनर यांचे मार्फत  एकात्मिक कमांड कंट्रोल सेंटर आणि डेटा सेंटर तयार करणेत येत आहे . त्यामध्ये पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी मिशन ( पॅनसिटी ) प्रकल्पांतर्गातील विविध प्रकारच्या देण्यात येणा – या सेवा उदा . सिटी नेटवर्क , स्मार्ट वॉटर , स्मार्ट सिवरेज , स्मार्ट ट्रॅफिक , स्मार्ट पार्किग , स्मार्ट एन्हार्नमेंट , सिटी सहायल्स इ.कामकाजाचा समावेश आहे.
सदरचे कामकाजासाठी स्मार्ट आय.ओ.टी. डिव्हायस बसविणेत येणार आहेत व त्यांचा सर्व डेटा हाएकात्मिक कमांड कंट्रोल सेंटर आणि डेटा सेंटर या ठिकाणी एकत्रित होणार आहे . त्याबाबतचे कामकाज में.टेक महिन्द्रा लि . Installation चे कामकाज सुरू असताना दि .२६ / ०२ / २०२१ रोजी सकाळी ११.१५ वाजता स्मार्ट सिटीचे  एकात्मिक कमांड कंट्रोल सेंटर आणि डेटा सेंटर येथे अज्ञातांकडून रनसमवेअ ( सायनर हल्ला ) झालेला आहे , त्यामध्ये डेटा सेंटरमधील एकूण २७ सर्व्हर इन्फेक्टेड झालेले असून सद्य : स्थितीत सदरचे सर्व्हर बंद करून ठेवलेले आहेत .
सदरचे सायबर हल्यामुळे २७ सर्व्हरमधील सर्व डेटा इन्फेक्टेड झालेला आहे . स्मार्ट सिटी प्रकल्पाचे कामकाज हे प्राथमिक स्वरूपात सुरू होते . स्मार्ट इलिमेंटस् चालू नसल्याने ते एकात्मिक कमांड कंट्रोल सेंटर आणि डेटा सेंटर याठिकाणी डेटा जात नव्हता त्यामुळे स्मार्ट सिटीचा कोणताही डेटा नष्ट झालेला नाही .
जो काही डेटा नष्ट झालेला आहे . त्यामध्ये सर्व्हर कॉन्फ्युगरेशन चा डेटा गेलेला आहे . सदर सायबर हल्यामुळे सदरचे एकात्मिक कमांड कंट्रोल सेंटर आणि डेटा सेंटर सुरू होण्यासाठी एक महिना उशिर होणार आहे व सदरचे सर्व २७ सर्व्हर परत सुरू करणे व त्याकरीता आवश्यक ती सुरक्षा यंत्रणा कार्यान्वीत करणे व त्यानंतर कॉलेज ऑफ इंजिनिअरीग पुणे यांचेमार्फत टेस्टींग व Cert in panel संस्थेकडून मे.टेक महिन्द्रा लि . यांनी अंमलबजावणी केलेल्या यंत्रणाबाबत अहवाल घेण्यात आल्यानंतरच पुढील कामकाज सुरू होईल.
सदरकामी पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि . चे कोणतेही आर्थिक नुकसान झालेले नाही फक्त सदरचे २७ सर्व्हर पुन्हा इन्टॉलेशन करणेकामी मे.टेक महिन्द्रा लि . यांचा एक महिना कालावधी जाणार आहे . त्याबाबत रितसर निगडी पोलिस ठाणे येथे सायबर गुन्हा नोंदविणेत आलेला असून पोलिस यंत्रणा पुढील तपास करत आहे . अशी माहिती पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि , चे संचालक तथा सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली .
Leave A Reply

Your email address will not be published.