सायरस मिस्त्री अपघात प्रकरण : कारची डेटा रेकॉर्डर चिप डीकोडिंगसाठी जर्मनीला पाठवली

0

मुंबई : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे रविवारी अहमदाबादमुंबई महामार्गावर अपघातात निधन झाले. त्यांचीमर्सिडीजबेंझ GLC-220 कार रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. या अपघातानंतर मर्सिडीजच्या हाय एंड लक्झरी कारच्या सुरक्षेवरहीप्रश्न उपस्थित केला जात आहे. आता पोलिसांनी ही कार बनविणाऱ्या मर्सिडीज बेंझ या जर्मन कंपनीकडून सुरक्षा वैशिष्ट्यांबाबत उत्तरमागतले आहे. कारची चिप कंपनीकडे पाठविली आहे.

पोलिसांचे म्हणणे आहे की, मर्सिडीजने योग्य चाचणी केल्यानंतरच आपली सर्व वाहने प्लांटमधून बाहेर काढल्याचा दावा केला आहे. त्यामुळे कंपनीला विचारण्यात आले आहे की, निर्मिती करणाऱ्यांनी चाचणी आणि तपासणीमध्ये धडक परिणामाचा अहवाल काय आहे. आणि कारमध्ये काही यांत्रिक दोष होता का? मर्सिडीजच्या GLC 220 ला ग्लोबल NCAP चाचणीत 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाल्यानेपोलिसांनीही हे प्रश्न उपस्थित केले आहेत.

कारचा अपघात होताच पोलिसांनी मर्सिडीज कंपनीला अपघाताची माहिती दिली होती. यानंतर कंपनीने पालघर पोलिसांना सांगितलेकी, कारमध्ये बसवण्यात आलेली डेटा रेकॉर्डर चिप डीकोडिंगसाठी जर्मनीला पाठवली जाईल. ते डीकोड केल्याने एसयूव्हीची संपूर्णमाहिती मिळेल. जी पोलिसांना दिली जाणार आहे.

व्हिडीओ फुटेज किंवा वेळेच्या गणनेच्या आधारे गाडीच्या वेगाचा अंदाज लावला जात असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. यावरूनगाडीचा सरासरी वेग कळतो, मात्र वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी गाडीचा वेग किती आहे, हे कळत नाही. अपघाताच्या वेळीकारच्या वेगाची अचूक माहितीही डेटा रेकॉर्डर चिपवरूनच उपलब्ध होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.