‘सालार’मध्ये प्रभासचा खतरनाक लूक 

0

नवी दिल्ली ः केजीएफ या बहुचर्चित सिनेमाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. त्या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आहे. त्यात प्रभास जबरदस्त स्टाईलमध्ये दिसणार आहे. ‘सालार’ असे या चित्रपटाचे नाव आहे. त्याचे पहिले पोस्टरदेखील रिलीज करण्यात आले आहे. त्याच प्रभास डॅशिंग आणि खतरनाक स्टाईलमध्ये दिसत आहे.

प्रभासने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्टर रिलीज केले आहे, त्यावर प्रभासच्या चाहत्यांची रिएक्शनदेखील मोठ्या प्रमाणात येत आहे. पोस्टर शेअर करत प्रभासने लिहिलं आहे की, ”आज मी सालारच्या जगात पाऊल ठेवले आहे. २१ जानेवारी २०२१ रोजी या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होत आहे.” प्रभासच्या चाहत्यांना हे पोस्टर खूप आवडलेलं आहे. काॅमेंट्सही मोठ्या प्रमाणात येत आहेत.

प्रभासची आगाची फिल्म ”राधे श्याम’ आहे. ज्यामध्ये पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. इतकंच नाही तर, ओम राऊत यांच्याबरोबर ‘आदिपुरुष’ चित्रपटही करत आहे. त्यानंतर दिपीका पोदुकोण हिच्याबरोबरही एक चित्रपट करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.