मुंबई ः विधान परिषदेच्या धुळे-नंदूरबार पोटनिवडणुकीत अमरिश पटेल यांचा दणदणीत विजय झाला आणि काॅंग्रेसचे उमेदवार अभिजीत पाटील यांचा दारूण पराभव झाल्यानंतर विरोध पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकरावर टीका केली आहे.
प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे सरकारवर टीका करताना ट्विट केले आहे की, “धुळे-नंदूरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात महाविकास आघाडी सरकारला आपली ५० टक्केही मतं राखू शकले नाही. यावरूनच उद्याचे महाविकास आघाडी सरकारचे भविष्य काय असेल हे स्पष्ट होते”, असे टिकास्त्र दरेकर यांनी सोडले आहे.
धुळे-नंदूरबारमधून भाजपाचे अमरीश पटेल यांनी विजय मिळविला आहे. त्यांना ३३२ मते मिळाली आहेत, तर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांना फक्त ९८ मतं पडलेली आहे. एकूण मते ४३७ होती, त्यातील ४३४ मतदारांना मतदान केले होते.