आयटी हब असणाऱ्या माणगावात गव्याचे दर्शन

0

पुणे : पुणे शहरात गवा पाहण्यासाठी उडालेली झुंबड आणि यातून गेलेला जीव..यानंतर पुन्हा बावधनमध्ये गव्याचे दर्शन झाले त्यानंतर एक दिवस हरिणाच्या कळप दिसला. हे असताना नवं वर्षाच्या पहाटे आयटी हब असलेल्या माणगावात गव्याचे दर्शन झाले. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

माण गावातील राक्षे वस्तीवर पहाटे साडेपाचच्या सुमारास मुळा नदीकडून गवा आल्याचे नागरिकांनी सांगितले. मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांच्या अंगावर गवा धावून आला त्यांनी तत्काळ पळ काढून घरात गेले.

घरातील इतर सदस्य बाहेर आल्यानंतर गवा नदीच्या दिशेने निघून गेला. गव्याचा बातमी माण गावात वाऱ्यासारखी पसरली असून ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.