लग्नाला नकार दिला म्हणून दर्शनाचा केला खून

0

पुणे : एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी 18 जून रोजी आढळून आला होता. दर्शनापवार हिच्या हत्येप्रकरणी राहुल हंडोरे याला पुणे पोलिसांनी मुंबईतील अंधेरी रेल्वे स्टेशनवरून अटक केली. दर्शना पवार हिनं लग्नासाठीनकार दिल्याने तिचा खून केल्याची कबुली राहुलने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दर्शनाचा खून करण्यासाठी आरोपी राहुल हंडोरे याने कंपासमधील कटरचा उपयोग केला. हे कटर पोलिसांनी जप्त केले आहे. तसेचआरोपी आणि दर्शना यांनी राजगडला जाण्यासाठी वापरलेली दुचाकी आणि खून करताना आरोपीने घातलेले कपडे पोलिसांनी जप्तकेले आहेत. पुढील तपासासाठी आरोपीच्या पोलीस कोठडीमध्ये सोमवारपर्यंत (3 जुलै) वाढ करण्यात आली आहे.

दर्शना पवार हिने लग्नाला नकार दिल्याने रागाच्या भरात तिच्यावर कंपासमधील कटर ब्लेडने तीन ते चार वेळा वार केले. यानंतर दगडानेमारहाण करत तिचा खून केला, अशी कबुली राहुल हंडोरे याने पोलिसांना दिली होती. त्यानुसार त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्यावस्तूंची माहिती घेत त्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

राहुल हांडोरेच्या पोलीस कोठडीची मुदत गुरुवारी (दि.29 जून) संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. हंडोरे यानेगुन्ह्यासाठी आणखी दोन शर्ट वापरले होते. ते अद्याप जप्त केलेले नाहीत. तसेच खून करुन तो काही दिवस फरार होता. दरम्यानच्याकाळात त्याला कोणी मदत केली आहे का? तो नेमका कोणत्या ठिकाणी राहिला, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. त्यामुळेत्याच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ करण्याची मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली.

त्यावर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. गणेश माने यांनी युक्तिवाद केला. गुन्ह्याचा प्राथमिक तपास पूर्ण झालेला आहे. त्यामुळे आरोपी राहुलहांडोरेच्या पोलीस कोठडीची गरज नसून न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी द्यावी, असा युक्तीवाद अ‍ॅड. माने यांनी केला. गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे, असे नमूद करत न्यायालयाने राहुल हांडोरेच्या पोलीस कोठडीत सोमवार (दि.3 जुलै) पर्यंत वाढ केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.