डेटिंग ॲपवरील ओळख…गुंगीचे औषध… बलात्कार…. व्हिडिओ शूटिंग… धमकी आणि गर्भपात

0

पिंपरी : डेटिंग ॲपवर ओळख झाल्यानंतर  भेटायला बोलावून, गुंगीचे औषध देऊन तरुणीवर बलात्कार केला. त्याचे चित्रीकरण करुन ते अश्लील व्हिडिओच्या व्हायरल करण्याची धमकी देत दीड वर्ष वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तसेच जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडून मारहाण केली.

याबाबत पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीचे नाव निखिल प्रेमराज आहे. पूर्ण नाव पत्ता माहित नाही. आरोपीने जानेवारी 2021 मध्ये बंबळे या डेटिंग अँप वरून स्वतःचे खोटे नाव निखिल प्रेमराज असे सांगून फिर्यादीशी ओळख करून त्यांचेशी लग्नाचे आमिष दाखवून व बिझनेसचा  बहाणा करून पुण्याला घेऊन गेला.

फिर्यादीस नशेच्या गोळ्या खायला देऊन वारंवार जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. त्यांना मारहाण केली. मुंबईला घेऊन जाऊन जबरदस्ती शरीरसंबंध ठेवले तसेच फिर्यादीच्या नकळत अश्लील व्हिडिओ बनवून ते इतरांना दाखविण्याची धमकी देत ब्लॅकमेल केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

आरोपी हा फिर्यादीच्या मुंबई येथील घरी जाऊन त्यांच्या वडिलांसमोर त्यांना मारहाण केली. तसेच गर्भपात केला.  ओपन रिलेशनशीप करण्यासाठी जबरदस्ती केली व घराची चावी घेऊन तेथून निघून गेला, असा आरोप पीडित महिलेने केला आहे.

पीडित महिलेने याबाबत हिंजवडी पोलिस ठाण्यात 17 जूनला फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी विरोधात भा. द. वि. कलम 376(2)(एन)(जे), 313, 328, 354(क), 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.