पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ च्या घोषणा ; PFI संघटनेच्या 100 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांना अटक

0

पुणे : पुण्यात एटीएस आणि एनआयएच्या पथकाने कारवाई करत कोंढवा येथून राष्ट्रीय तपास यंत्रणा, ईडी (ED) आणि एटीएस यांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI)काही कार्यकर्त्यांना अटक केली होती.

या विरोधात पुण्यात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात सहभागी झालेल्या तब्बल 60 ते 70 कार्यकर्त्यांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताब्यात घेतल्यानंतर काही आंदोलनकर्त्यानी यावेळी “पाकिस्तान जिंदाबाद” अशा घोषणा दिल्या. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरुन सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात येत आहे, संबधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नेटकरी करीत आहेत.

देशाविरोधात आणि समाज विघातक कारवाया केल्याच्या संशयावरून देशातील 12 राज्यात राष्ट्रीय तपास यंत्रणा, ईडी आणि एटीएस यांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या अनेक कार्यालयांवर छापे टाकले होते. या कारवाईत 100 पेक्षा अधिक पीएफआयच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती.रिजाज जैनुद्दीन सय्यद (वय 26, शिवनेरी नगर कोंढवा खुर्द, पुणे) यांच्यासह 60 ते 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार नवनाथ डांगे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

दोन दिवसांपूर्वी एनआयएने महाराष्ट्रासह तेलंगाणा, केरळ, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह इतर राज्यांमध्ये ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’शी संबंधित अनेक ठिकाणांवर मोठी कारवाई केली होती. आसाममध्ये पीएफआयशी संबंधित ९ जणांना ताब्यात घेतलं. तर तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशातही एनआयएने या महिन्याच्या सुरवातीला जवळपास ४० ठिकाणी छापे टाकले होते.

देश विघातक कृत्य केल्याप्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणांकडून ही कारवाई करण्यात येत आहे. नाशिकमध्येही पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या काही सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी कोंढव्यातील पीएफआय या संघटनेच्या कार्यालयावर छापा टाकत काही साहित्य जप्त करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.