”शेतकऱ्यांना देशद्राही ठरवंण, हे तर आणीबाणीपेक्षा भयंकर”

0

मुंबई ः ”कृषी कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरून आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या अन्नदाता शेतकऱ्यांशी संवाग साधण्याऐवजी केंद्रसरकार त्यांनी देशद्राही ठरवत आहे, हे आणीबाणीपेक्षा भयंकर आहे. देशात जे सुरू आहे ती घोषीत आणीबीणी आहे का?”, अशा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ”शेतकरी आंदोलकांनी कधी डावे, कधी खलिस्तानी, कधी चीन-पाकिस्तानचे पाठबळ असल्याचे सांगतात. आपल्या न्याय हक्कांसाठी कोणी बोलले तर, त्यांना देशद्रोही ठरवले जाते. भाजपाने शेतकरी आंदोलनाबाबत एक काय ते ठरवावे,” असेही बोलत उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षावर निशाणा साधला.

”देशातील जागरुक जनता सर्व बघत असून त्यांच्या सहनशक्तीचा अंत बघू नये. असला तुघवकी कारभार देशातील जनता सहन करणार नाही. शेतकऱ्यांच्या हिताची नसलेली कृषी कायद्यातील एकही गोष्ट माहाविकास आघाडीचे सरकार स्वीकारणार नाही”, असे ठाकरे यांनी जाहीर केले.

विधानपरिषदेतील १२ सदस्यांची नियुक्ती ही राज्यपालांच्या अधिकारात येते. मात्र, त्यांनी हा अधिकार आपल्या मर्जीप्रमाणे वापरला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ज्या राज्यांमध्ये विधानपरिषद आहे, त्या सर्वांनी याबाबत चर्चा करण्याची गरज आहे. सदस्य नियुक्त करण्याचा कालावधी का नसावा, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राजकारण करत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचित केले.

Leave A Reply

Your email address will not be published.