दीपिका पादुकोण सोशल मीडियावरून गायब

0

मुंबई ः प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पोदिकोण सोशल मीडियामधून गायब झालेली दिसत आहे. तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंडवरील सर्व पोस्ट आणि फोटो डिलीट केलेले आहे. ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंड पूर्णपणे रिकामे केले आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये अनेक तर्कवितर्कांना उधाण आलेले आहे.

दीपिका पादुकोनच्या मनात नेमकं चाललंय तरी काय, हा प्रश्न सध्या सर्वांना पडला आहे. कोणी म्हणतंय प्रमोशनचा फंडा आहे, तर कोणी म्हणतंय कदाचित तिला सर्व आठवणी पुसून टाकायच्या असतील, तर तिला सोशल मीडियापासून दूर राहायचं असेल, म्हणून तिने सर्व पोस्ट आणि फोटो डिलीट केलेले असावेत, काहीही असो दीपिका सध्या पती रणवीरसोबत रणथंबोर येथे नवीन वर्ष एन्जाॅय करत आहे.

दीपिकाचा सोशल मीडियावरील फाॅलोअर्स मिलीयनच्या घरात आहे. ट्विटरवर २७.७ मिलीयन, इन्स्टाग्रामवर ५२.५ मिलियन इतके फाॅलोअर्स आहेत. असे असताना तिने असा निर्णय का घेतला असावा, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तिचे सोशल अकाउंड हॅक झाले आहे की, काय असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.