मुंबई ः बाॅलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण केवळ भारतातच नाही तर, जगातील एक नामांकित अभिनेत्री आहे. जागतिक स्तरावर अभिमान वाटेल अशी कामगिरी तिने केलेली आहे. नुकतेच एथेंस इंटरनॅशनल एअरपोर्टवर दीपिकाचे कॅम्पेन दाखविण्यात आले. त्यामध्ये ‘द ऑथेंटिक स्माइल्स ऑफ पीपल ऑफ द वर्ल्ड’ दीपिकावर फीचर करण्यात आले आहे.
दीपिकने आपल्या दमदार अभिनयाने आणि कौशल्याने सर्वांना आश्चर्यचकीत केलेले आहे. साधारणपणे दीपिकाची स्माईल ही गाॅडगिफ्ट असल्याचे सर्वजण मानतात आणि तिचे कौतुकदेखील करतात. ऑथेंटिक स्माइल्स कॅम्पेन अशाेवळी दाखविण्यात आले की, जेव्हा एथेंट इंटरनॅशनल एअरपोर्टने एका विश्रांतीनंतर प्रवाशांचे स्वागत करायला सुरुवात केली जे करोना महामारीमुळे थांबलेले होते. प्रवाशांचे हार्दीक स्वागत करण्यासाठी वापरले गेले.
दीपिकाचे चाहते आणि संपूर्ण भारत तिच्यावर गर्व करत आहेत. कारण, एक भारतीय अभिनेत्री अथेंसमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करत आहे. दीपिका एका साडीमध्ये आणि गळ्यात चोकर हार आहे, असा पुतळा उभारला आहे. त्याखाली लिहिले आहे की, भारतीय अभिनेत्री अथेंस विमानतळावर हसत स्वागत करत आहे.”