शारीरीक संबंधाची मागणी; मॉलच्या मॅनेजरवर विनयभंगाचा गुन्हा

0

पुणे : रिपोर्टिंगला आलेल्या महिलेकडे एकटक पाहणे, लगट करण्याचा प्रयत्न करुन शारीरीक संबंधाची मागणी करणार्‍या कोंढवा परिसरातील एका मॉलच्या मॅनेजरवर कोंढवा पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

प्रशांत मोरे (४०, कोंढवा) असे या मॅनेजरचे नाव आहे. याप्रकरणी एका ३६ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार १७ फेब्रुवारी २०२२ पासून आतापर्यंत घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत मोरे हा परिसरातील एका मॉलमध्ये मॅनेजर आहे. त्याच्या ऑफिसमध्ये रिपोर्टिंग करण्यासाठी फिर्यादी गेल्या. तेव्हा तो फिर्यादीकडे एकटक बघत असे. कारण नसताना त्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करत. त्यांच्यासोबत शारीरीक संबंध ठेवण्यास त्याने फिर्यादी यांना सांगितले. त्याला फिर्यादी यांनी नकार दिला. तेव्हा त्यांना कामावरुन काढून टाकले. त्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक तोरगल तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.