बांधकाम व्यावसायिकाला खंडणी मागणारा अटकेत

0

पिंपरी : मला तुझा सगळा कच्चा- चिट्ठा  माहिती आहे म्हणत पाच लाख रुपयांची खंडणी मागत जिवे मारण्याची धमकी देणाऱ्याला देहुरोड पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार 6 ते 7 सप्टेंबर या कालावधीत देहूरोड पोलीस ठाण्याबाहेरच झाला.

याप्रकरणी दिनेश बाबुलाल सिंग (वय 38 रा. देहुरोड) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अनिल कचरू राऊत (वय 52 रा. देहुरोड) याला अटक पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार,फिर्यादी हे कंन्स्ट्रक्टर आहेत.आरोपी याने फिर्यादीला 6 सप्टेंबर रोजी फोनवरून शिवीगाळ करत मला तुझा सगळा कच्चा-चिट्ठा माहित आहे.त्यामुळे तू मला 5 लाख रुपये दे नाही तर मी तुझ्याकडून 50 लाख रुपये उकळेन, अशी धमकी दिली.फिर्यादी दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात गेले असता तेथेही आरोपीने तू माझ्या विरोधात तक्रार करत आहेस,पण मी जेलमधून बाहेर आलो की तूला गाडून टाकेन, अशी धमकी दिली.थेट पोलीस ठाण्याबाहेर उभा राहून धमकी देणाऱ्या आरोपीला देहुरोड पोलिसांनी अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.